Type Here to Get Search Results !

1 एप्रिलपासून ATM नियमांमध्ये मोठे बदल

* पैसे काढणे होणार महाग ? मोफत व्यवहारांची मर्यादा कमी, अतिरिक्त व्यवहारांवर शुल्क

मुंबई / प्रतिनिधी :- नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2026 पासून देशातील अनेक बँकिंग नियमांमध्ये बदल होणार असून त्याचा थेट परिणाम एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत कपात, मोफत व्यवहारांची संख्या कमी आणि अतिरिक्त व्यवहारांवर वाढीव शुल्क अशा बदलांमुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

* HDFC बँकेचे नवे नियम लागू :- एचडीएफसी बँकेने यूपीआय आधारित एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मोफत व्यवहारांच्या मर्यादेशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार मेट्रो शहरांमध्ये दरमहा 3 मोफत व्यवहार व नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार करता येतील. मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ₹23 + कर शुल्क आकारले जातील. यामुळे एटीएमचा अधिक वापर करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.


* PNB कडून पैसे काढण्याची मर्यादा कमी :- पंजाब नॅशनल बँकेने (PNB) काही डेबिट कार्डवरील दररोज पैसे काढण्याची मर्यादा कमी केली आहे. पूर्वी ₹1,00,000 पर्यंत मर्यादा होती, ती आता ₹50,000 पर्यंत करण्यात आली आहे. तसेच काही प्रीमियम कार्डसाठी पूर्वी ₹1.5 लाख मर्यादा होती, ती आता ₹75,000 करण्यात आली आहे. या बदलामुळे मोठी रक्कम काढणाऱ्या ग्राहकांना अडचण निर्माण होऊ शकते.


* बंधन बँकेचेही नियम बदलले :- बंधन बँकेनेही एटीएम व्यवहारांबाबत नवीन नियम लागू केले आहेत. स्वतःच्या एटीएमवर दरमहा 5 मोफत व्यवहार व इतर बँकांच्या एटीएमवर 3 मोफत व्यवहार करता येतील. त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ₹23 + कर शुल्क आकारले जाणार आहे. 


* ग्राहकांनी काय लक्षात ठेवावे ? :- एटीएम व्यवहारांची संख्या नियोजनपूर्वक वापरा, शक्यतो UPI, नेटबँकिंग किंवा डिजिटल पेमेंटचा वापर वाढवा, मोठ्या रकमेचे व्यवहार कमी वेळा करा, आपल्या बँकेचे नवीन नियम आधीच तपासा असे आवाहन करण्यात आले आहे. 


* खिशावर किती परिणाम होणार ? :- मोफत व्यवहारांची मर्यादा कमी झाल्याने आणि अतिरिक्त शुल्क लागू झाल्याने एटीएमचा वारंवार वापर करणाऱ्या ग्राहकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः मेट्रो शहरांमध्ये हा परिणाम अधिक जाणवू शकतो.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement