Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात डॉं. बाबासाहेब आंबेडकरांची 135 वी जयंती जल्लोषात साजरी

* भव्य मिरवणूक, विविध कार्यक्रमांनी शहर दणाणले ; शिस्तबद्ध आयोजनाने वेधले लक्ष

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- विश्वरत्न, भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त नगरदेवळा येथे उत्साह, जल्लोष आणि अभिमानाच्या वातावरणात भव्य सोहळा साजरा करण्यात आला. डॉं. आंबेडकर नगर परिसर तसेच मुख्य बाजारपेठ परिसरात जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी 8 वाजता डॉं. आंबेडकर नगर येथील डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी बुद्ध वंदना व धार्मिक विधी पार पडून उपस्थित मान्यवरांनी डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन विश्वरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था व जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये अध्यक्ष स्वप्निल विलास धिवरे, उपाध्यक्ष शुभम संजय पवार, खजिनदार प्रकाश प्रमोद पवार, उपखजिनदार आतिश दयानंद जगताप, सचिव करण ज्ञानेश्वर जाधव तसेच समिती सदस्य समीर राजेंद्र पवार, सतीश सखाराम पवार, विकी नाना पवार, आकाश मिलिंद बागुल, प्रदीप सुधाकर पवार, मनोज सुखदेव बागुल, आकाश दिलीप भालेराव, मिलिंद तुकाराम पवार, लक्ष्मण पिरा बागुल यांच्यासह युवा नेते अभिजीत पवार व शेकडो समाजबांधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी झाला.

या सोहळ्यास नगरदेवळा व परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामध्ये माजी सरपंच प्रतीक्षा किरण काटकर, सरदार एस. के. पवार विद्यालयाचे प्राचार्य किरण काटकर, ग्राम शिक्षण समितीचे सचिव शिवनारायण जाधव, भाजप नेते प्रणय (मुन्ना) भांडारकर, प्रा. उमेश काटकर, जोशी सर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे, माजी सरपंच सुधाकर महाजन, नामदेव भावडू पाटील, माजी उपसरपंच विनोद राऊळ, विलास भामरे, आदित्य फाउंडेशन अध्यक्ष आदित्य परदेशी, नगरदेवळा औट पोस्टचे PSI योगेश गणगे, सहाय्यक फौजदार निवृती मोरे, माजी ग्राम पंचायत सदस्य सुनील राऊळ, अन्नू मेंबर, रज्जाक शेख, डॉं. जयंत काटकर, जेष्ठ नेते किरण पवार, दीपक पवार, पद्माकर पवार, भद्रे सर, रोशन जाधव सर, , विकासो सोसायटी संचालक इंद्रनील भामरे, पिपल्स बँक संचालक अविनाश कुडे, जेष्ठ पत्रकार प्रकाश जगताप, डॉं. किरण चव्हाण, विलास सोनवणे, महादू वाघ, भारत केदार, नवल बागुल, सुरेश बागुल, जयदेव बागुल, संतोष गायकवाड यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच नगरदेवळा गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


दुपारच्या सत्रात बाजारपेठ परिसरात झेलीम पथकाने आपल्या दमदार सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात वातावरण भारावून गेले. सायंकाळी 7 वाजता विश्वरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था व जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. डॉं. आंबेडकर नगर येथील डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून मिरवणुकीला सुरूवात झाली. त्यानंतर राम मंदिर चौक, होळी मैदान चौक, मारवाडी गल्ली, बाजारपेठ, वाणी गल्ली, परदेशी गल्ली करीत पुन्हा स्मारकाजवळ मिरवणूक पोहचली. घोषणाबाजी, डिजे, फटाक्यांची आतिशबाजी आणि उत्साही वातावरणात संपूर्ण नगरदेवळा निळ्या रंगात न्हाऊन निघाले होते.


कार्यक्रमादरम्यान PSI योगेश गणेगे व सहाय्यक फौजदार निवृती मोरे यांनी योग्य नियोजन करून कायदा व सुव्यवस्था राखली. संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या जयंती सोहळ्याद्वारे डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचा जागर झाला. नगरदेवळा येथे हा सोहळा केवळ उत्सव न राहता सामाजिक ऐक्य आणि प्रेरणेचा संदेश देणारा ठरला.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement