* बुद्ध वंदना, सत्कार सोहळा, विद्यार्थ्यांची भाषणे व भव्य मिरवणुकीने गाव दणाणले
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- पाचोरा तालुक्यातील चुंचाळे येथे विश्वरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा रंगतदार ठरला.
सकाळी 7 वाजता बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा समाजबांधवांकडून सत्कार करण्यात आला. नगरदेवळा गावाचे सुपुत्र युवा नेते प्रणय (मुन्ना) भांडारकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये भाजप नेते प्रणय भांडारकर यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. सरदार एस. के. पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण काटकर सर यांचा बौद्ध बांधवांकडून सत्कार करण्यात आला. तसेच मुलींसाठी अभ्यासिका सुरू करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय युवती अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांचा महिलांकडून विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरदेवळा ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच विलास भामरे, आदित्य फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य परदेशी, सुरेश पाटील, विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद जगताप, मंडळ तलाठी आप्पा, विजय नाना पाटील, नाना पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी नुकतीच पोलीस भरती झालेला गावातील युवक रोहित बागुल तसेच डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची नियमित रंगरंगोटी करणारे पुरणदास सोनवणे (पेंटर) यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात इयत्ता 1 ली ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनसंघर्षावर व कार्यावर आपले विचार मांडले.यामध्ये छाया पाटील, समर्थ पाटील, जान्हवी कदम, मयुरी कदम, श्रद्धा कदम, आराध्य कदम, मानवी, नक्ष क्षीरसागर, पूर्वी वाणे, संजना कदम, सुमिता कदम, पूनम कदम, सिद्धांत बागुल, अर्चना बागुल, दीक्षा सोनवणे, शुभांगी वाणे या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग उल्लेखनीय ठरला.
सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची बग्गीवर भव्य मिरवणूक काढण्यात आली. बँड-बाजाच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले. त्यामध्ये सुनील कदम, हिलाल गायकवाड, नाना वाणे, विलास सोनवणे, दादा कदम (पोलीस पाटील), विनोद कदम, भिमराव बागुल, संजय कदम, सुधाकर सावळे, संदीप वाणे, संतोष कदम, रावसाहेब कदम, समाधान अहिरे, प्रितम सोनवणे, संदीप कदम, अजय कदम, शुभम कदम, सावित्रीबाई कदम, रजनी क्षीरसागर, हिरकणीबाई कदम, अरुणाबाई सावळे, जनाबाई वाणे, पुजाबाई बागुल, हर्षदा क्षीरसागर, प्रज्ञा सोनवणे, पूनम कदम, स्वरांजली कदम यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विलास सोनवणे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी हिलाल गायकवाड यांनी आभार मानले.


Post a Comment
0 Comments