* जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचा उपक्रम
* भीम प्रार्थनेतून महामानवांना अभिवादन
घणसोली, नवी मुंबई / प्रतिनिधी :- जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था (रजिस्टर) घणसोली, नवी मुंबई यांच्या वतीने भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न व महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मंगळवार, 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता कै. अण्णासाहेब पाटील उद्यान, सेक्टर 4, घणसोली येथील जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष भास्कर आव्हाड यांच्या हस्ते डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये अध्यक्ष भास्कर आव्हाड, रमेश रणपिसे, अशोक जाधव, विश्वनाथ बोडके, आमोणकर, प्रभाकर देशमुख यांचा समावेश होता.
कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थितांनी डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आठवण करीत त्यांना विनम्र अभिवादन केले. “भीम प्रार्थना” सादर करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.


Post a Comment
0 Comments