* अन्यायाविरुद्ध बुलंद आवाज उंचावणाऱ्या पत्रकारितेचा कोल्हापुरात गौरव
कोल्हापूर - खोपोली - नगरदेवळा / खलील सुर्वे - मानसी कांबळे :- निर्भीड, निडर आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेचा बुलंद आवाज ठरलेले दै. कोकण प्रदेश न्यूज व केपी न्यूजचे मुख्य संपादक फिरोज पिंजारी यांना प्रतिष्ठेचा ‘निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. गुरुवार, दि. 9 एप्रिल 2026 रोजी कोल्हापूर येथील दसरा चौकातील श्री शाहू स्मारक भवन येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात हा सन्मान उत्साहात देण्यात आला.मंथन फाऊंडेशन, कपिलेश्वर यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार फिरोज पिंजारी यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि शाल देऊन गौरविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते व मंथन फाउंडेशनचे अध्यक्ष सागर शेळके यांच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती सारिका यशवंत नांदेकर तर प्रमुख वक्ते शिवराज कॉलेज गडहिंग्लजचे संस्थापक प्रा. किसनराव कुराडे होते.
* 18 वर्षांची निर्भीड पत्रकारिता :- गेल्या तब्बल 18 वर्षांपासून फिरोज पिंजारी यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि विविध समस्यांवर ठामपणे आवाज उठविला आहे. निर्भीड लिखाण, तडफदार भूमिका आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ते दै. कोकण प्रदेश न्यूज, दै. कोकण प्रजा, केपी न्यूज तसेच विविध डिजिटल न्यूज पोर्टलचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन (NJA) चे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांनी पत्रकारांच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे.
* पत्रकारिता, समाजसेवा आणि आंदोलनात सक्रिय भूमिका :- फिरोज पिंजारी यांनी केवळ पत्रकारिता न करता सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने लेखन आणि आंदोलन केले आहे. अनेक संवेदनशील मुद्द्यांवर त्यांनी निर्भीडपणे भूमिका घेत प्रशासनाला जागे करण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
* भव्य सोहळा : विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव :- कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. विशेष म्हणजे पुरस्कार वितरणापूर्वी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि कलाकारांचा प्रथम सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
या सोहळ्यात जितेंद्र मोहन चोकाककर यांना "आदर्श राज्य क्रीडा सहकार गौरव पुरस्कार", ह.भ.प. शिवाजी शांताबाई विठ्ठल चौगुले यांना "आदर्श प्रेरणादायी व्यक्तिमत्व पुरस्कार", दयानंद गणपती निकम यांना "सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व पुरस्कार", तसेच शशिकांत जयसिंग लिंबारे (वरळी, मुंबई) यांना "समाजहित पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026" प्रदान करण्यात आला.
आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीरेंद्र रमेश जोईल यांना "आरोग्य संरक्षण दूत पुरस्कार 2026" तर विशाल आनंदराव जाधव (नवी मुंबई) यांना "वैद्यकीय सेवा समाजभूषण पुरस्कार 2026" देऊन गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या पल्लवी दीपक सकपाळ यांना "आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2026" प्रदान करण्यात आला.
ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या अनेक महिलांचा देखील सन्मान करण्यात आला. यामध्ये नंदा शिवाजी यादव, जयशीला माधव सूर्यवंशी, मेघा शिवाजी चौगुले, सोनम तुषार चिखलकर, सुनंदा मारुती माने, प्रज्ञा प्रदीप मेढे, सरिता उत्तम जाधव यांसह अनेक महिलांना विविध "नारी शक्ती" आणि सक्षमीकरण पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
पत्रकारिता, समाजसेवा आणि युवक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनाही या सोहळ्यात विशेष सन्मान देण्यात आला. पत्रकार फिरोज पिंजारी (कर्जत), काळुराम पांडुरंग लांडगे (पुणे), किरण दगडू पवार, स्वप्निल साताप्पा कांबळे, चंद्रकांत गेनू साळुंके यांसह अनेकांना विविध गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. याशिवाय औद्योगिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही गौरविण्यात आले. संभाजी रामचंद्र चव्हाण, तानाजी वसंत सावंत, रोहन अनिल भोसले, तुषार शरद येडके, सौरभ विराज सुतार, शिवाजी सुतार यांना "परंपरागत कला गौरव पुरस्कार 2026" प्रदान करण्यात आला.
* नियोजनात कार्यकर्त्यांचा सहभाग :- कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉं. आश्लेषा चव्हाण, सोनल सुतार, सुप्रिया गोरे, साक्षी गोरे, मोहिनी माने, सुमन सुतार, रजिया आगा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. महाराष्ट्र ब्लॅक कमांडो फोर्स आणि स्थानिक युवकांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन ज्योती गायकवाड आणि सचिन वाडकर यांनी प्रभावीपणे केले.
या सन्मानानंतर पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून फिरोज पिंजारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याला या पुरस्कारामुळे नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments