* मोनिका गौरव (कुमार) दिसले उपसरपंचपदी विराजमान
खालापूर / खलील सुर्वे :- खालापूर तालुक्यातील बिडखुर्द ग्रामपंचायतीत महिलांच्या नेतृत्वाला बळ देणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून मोनिका गौरव (कुमार) दिसले या उपसरपंचपदी विराजमान होणार आहेत. शुक्रवार, 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता त्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न होणार असून या निवडीमुळे गावात उत्साहाचे आणि अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोनिका दिसले यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायतीत महिलांचे नेतृत्व अधिक बळकट झाले आहे. सामाजिक कार्यातील सातत्य, नागरिकांशी जपलेले स्नेहबंध आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांचे नेतृत्व गावासाठी आश्वासक मानले जात आहे. ग्रामस्थांनीही त्यांच्या निवडीचे स्वागत करीत “महिलांच्या नेतृत्वातून गावाचा सर्वांगीण विकास होईल” असा विश्वास व्यक्त केला आहे.
नव्या उपसरपंचांच्या माध्यमातून बिडखुर्द गावात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, ग्राम स्वच्छता मोहिमा तसेच सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठी ठोस उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पारदर्शक प्रशासन आणि लोकसहभागाच्या जोरावर ग्रामविकासाला गती देण्याचा संकल्प नव्या नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गावाच्या प्रगतीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून ग्रामस्थांच्या सहकार्यानेच बिडखुर्द ग्रामपंचायत विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि मोनिका गौरव (कुमार) दिसले यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments