Type Here to Get Search Results !

'नेचर केअर सन्मान 2026’ : महिला शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

* कष्ट, जिद्द आणि नवकल्पनांचा उत्सव ; महाराष्ट्रासह पाच राज्यांतील 11 महिला शेतकरी ठरल्या मानकरी

रायगड / खलील सुर्वे :- सेंद्रिय शेती क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या नेचर केअर फर्टिलायझर्स तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘नेचर केअर सन्मान 2026’ यंदा विशेषतः महिला शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाला समर्पित करण्यात आला आहे. गेल्या तब्बल 29 वर्षांपासून सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार करीत हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या संस्थेने यंदा सामाजिक कृतज्ञतेचा हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने महिला शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून वर्ष घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पुरस्कार केवळ महिला शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमधून प्राप्त झालेल्या एकूण 77 अर्जांमधून कठोर आणि पारदर्शक निवड प्रक्रियेनंतर 11 महिला शेतकऱ्यांची अंतिम निवड करण्यात आली.


या पुरस्कारासाठी तीन टप्प्यांची सखोल निवड प्रक्रिया राबविण्यात आली. प्राथमिक छाननी, प्रत्यक्ष शेती पाहणी, सखोल मुलाखत या प्रक्रियेदरम्यान महिला शेतकऱ्यांचा शेतीतील प्रत्यक्ष सहभाग, मेहनत, पीक नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, बाजारपेठेतील कौशल्य आणि सामाजिक प्रभाव या सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला.


* मुख्य पुरस्कार विजेत्या (प्रत्येकी रु. 51,000/-) :- 

- ललिता राहुल सोनवणे (दिंडोरी, नाशिक)

- स्वाती नाना काळे (पंढरपूर, सोलापूर)

- रसिका अनिल फाटक (सुधागड, रायगड)

- लता अनिल पोहेकर (मोर्शी, अमरावती)

- सीमा चंद्रकांत जाधव (खेड, पुणे)

- अश्विनी परशराम माळी (पलूस, सांगली)

* विभागून पुरस्कार (प्रत्येकी रु. 25,000/-) :- 

- सविता संदीप तेली (हातकणंगले, कोल्हापूर)

- नीलम वसंत रंदवे (माढा, सोलापूर)

- मनिषा भास्कर शिंदे (माढा, सोलापूर)

- आदिती अशोक थिटे (रोहा, रायगड)

* उत्तेजनार्थ पुरस्कार (रु. 21,000/-) :- 

श्रीया मुकुंद इनामदार (निपाणी, बेळगाव)


या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन 18 एप्रिल 2026 रोजी विटा येथे करण्यात आले असून मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमात पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ तसेच आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.


* निवड समितीची महत्त्वपूर्ण भूमिका :- या पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेत अॅग्रोनॉमिस्ट डॉं. आशिष वेले, ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ अरुण नाईक आणि उद्योजिका कामाक्षी बर्वे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.


* महिला सशक्तीकरणाचा प्रेरणादायी संदेश :- 'नेचर केअर सन्मान 2016’ हा केवळ पुरस्कार नसून महिला शेतकऱ्यांच्या कष्ट, जिद्द आणि नवकल्पनांना दिलेली योग्य दाद आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचे वाढते योगदान अधोरेखित करीत हा उपक्रम इतर महिलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement