Type Here to Get Search Results !

राष्ट्रसेवा, शिस्त आणि कर्तृत्वाचा संगम!

* कॅंप्टन डॉं. शीतल गायकवाड यांना ‘भारतीय सेवा सन्मान’

* तरुणाईमध्ये देशभक्तीची ज्योत पेटवणाऱ्या कार्याचा गौरव 

खोपोली / खलील सुर्वे :- राष्ट्रसेवा, शिस्तबद्ध जीवनशैली आणि कर्तृत्वाचा संगम साधत प्रभावी कार्य करणाऱ्या एनसीसी (NCC) कॅंप्टन डॉं. शीतल के. गायकवाड यांना प्रतिष्ठेचा ‘भारतीय सेवा सन्मान’ पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. सेवापृथ फाउंडेशनतर्फे देण्यात आलेला हा सन्मान त्यांच्या बहुआयामी आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेणारा ठरला आहे.

NCC कॅप्टन म्हणून डॉं. शीतल गायकवाड यांनी तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि देशभक्तीची भावना रुजविण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. विद्यार्थ्यांना केवळ प्रशिक्षण देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी त्यांच्यात सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास आणि राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण केली आहे.


* आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातही झळकले यश :- डॉं. गायकवाड यांनी कराटे, ज्युडो, बॉक्सिंग, किकबॉक्सिंग, रेसलिंग आणि कुंग फू या विविध क्रीडा प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ खोपोलीच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.


* अडथळ्यांवर मात करीत यशाचा प्रवास :- शिस्त, कठोर परिश्रम आणि राष्ट्रसेवेप्रती असलेली निष्ठा या गुणांच्या जोरावर त्यांनी अनेक अडचणींवर मात करीत यशाची उंच शिखरे गाठली आहेत. त्यांचा संघर्ष आणि जिद्द आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


‘भारतीय सेवा सन्मान’ हा केवळ पुरस्कार नसून त्यांच्या कार्याचा गौरव करणारा मानाचा तुरा आहे. त्यांच्या कार्यामुळे युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असून त्या अनेकांसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व ठरत आहेत. या सन्मानामुळे खोपोलीसह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉं. शीतल गायकवाड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement