* नगरदेवळ्यात मित्रपरिवाराकडून सत्कार
* सत्यनिष्ठ आणि निडर पत्रकारितेची दखल
नगरदेवळा / हसीबूर शेख :- निर्भीड आणि जनहितासाठी कटीबद्ध पत्रकारितेचा वसा जपणारे दै. कोकण प्रदेश न्यूज व केपी न्यूजचे मुख्य संपादक पत्रकार फिरोज पिंजारी यांना ‘निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026’ हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सन्मान मिळाल्याबद्दल नगरदेवळ्यात मित्रपरिवाराच्या वतीने छोटेखानी सत्कार करण्यात आला.
गुरुवार, 9 एप्रिल 2026 रोजी कोल्हापूर येथील दसरा चौकातील श्री शाहू स्मारक भवन येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात फिरोज पिंजारी यांना ‘निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या धाडसी, निडर आणि समाजहितासाठी झटणाऱ्या पत्रकारितेची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या उल्लेखनीय यशानंतर नगरदेवळा येथे युवा नेते जिब्राईल (जिब्बू) शेख, चेअरमन नूर बेग, ज्येष्ठ नेते प्रकाश काटकर, अफजल खान, गनी टेलर आदी मित्रपरिवाराने एकत्र येत फिरोज पिंजारी यांचा सन्मान केला. यावेळी त्यांच्या कार्याचे कौतुक करीत, समाजातील अन्यायाविरुद्ध बुलंद आवाज उठविणाऱ्या पत्रकारांची गरज आज अधिक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
जिब्राइल शेख म्हणाले की, समाज आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून पत्रकार महत्त्वाची भूमिका बजावतात. कोरोना काळ असो वा दैनंदिन समस्या, पत्रकारांनी नेहमीच सत्याची बाजू मांडली आहे. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे.
फिरोज पिंजारी यांनी सातत्याने सामाजिक प्रश्न, प्रशासनातील त्रुटी आणि सर्वसामान्यांच्या अडचणी यांना वाचा फोडत पत्रकारितेची खरी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या लेखणीमुळे अनेक प्रश्नांना न्याय मिळाल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.


Post a Comment
0 Comments