Type Here to Get Search Results !

जामा मस्जिद पंच कमिटीकडून ज्येष्ठ पत्रकार फिरोज पिंजारी यांचा सत्कार

* सामाजिक बांधिलकी आणि निर्भीड पत्रकारितेचा गौरव

* समाजहितासाठी कार्य करणाऱ्या पत्रकाराला मानाचा मुजरा

नगरदेवळा / हसीबूर शेख :- नगरदेवळा येथील जामा मस्जिद पंच कमिटीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार फिरोज पिंजारी यांचा आज, 13 एप्रिल 2026 रोजी सत्कार करण्यात आला. समाजातील सर्वसामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.

या निमित्ताने जामा मस्जिद परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फिरोज पिंजारी यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी पिंजारी यांच्या कार्याचे कौतुक करताना, त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी संवाद साधत न्याय मिळवून देण्याचा केलेला प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे सांगितले.


फिरोज पिंजारी यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या लेखणीमुळे अनेकांना न्याय मिळाला असून समाजहितासाठी त्यांनी घेतलेली भूमिका प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला हाजी गनी शेठ, चेअरमन नूर बेग, सादिक बागवान, झाकीर खान, जुबेर खान, पत्रकार हसीबूर शेख यांच्यासह समाजातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सत्काराला उत्तर देतांना फिरोज पिंजारी म्हणाले की, हा सन्मान माझ्या कार्याची पावती असून पुढील काळातही समाजसेवेसाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. हा सत्कार माझ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement