Type Here to Get Search Results !

कोकण मराठी साहित्य परिषद खोपोली शाखेचा 31 वा वर्धापन दिन व कै. र. वा. दिघे यांची 130 वी जयंती

* 9 एप्रिल रोजी खोपोलीत विशेष साहित्य सोहळ्याचे आयोजन

* नामवंत साहित्यिकांची उपस्थिती ; साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन

खोपोली / दिनकर भुजबळ :- कोकण मराठी साहित्य परिषद, खोपोली शाखेच्या वतीने संस्थेचा 31 वा वर्धापन दिन आणि ज्येष्ठ साहित्यिक कै. र. वा. दिघे यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त विशेष साहित्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, 9 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.

हा सोहळा खोपोली येथील ब्राह्मण सभा सभागृह, भानवज रोड येथे पार पडणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे हे असणार आहेत.


या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, अनुवादक व पत्रकार हेमंत कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता किर तसेच केंद्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉं. प्रदीप धवल उपस्थित राहणार आहेत. याशिवाय माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, विश्वस्त एल. बी. पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, केंद्रीय प्रतिनिधी गणेश कोळी, बी. एस. म्हाने, वामनराव दिघे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.


या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ साहित्यिक कै. र. वा. दिघे यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव करण्यात येणार असून त्यांच्या योगदानाला अभिवादन केले जाणार आहे. तसेच साहित्य क्षेत्रातील विविध घडामोडींवर चर्चाही अपेक्षित आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शाखाध्यक्ष प्रकाश राजोपाध्ये, कार्यवाह नरेंद्र हर्डीकर, उपाध्यक्ष डॉं. भाऊसाहेब नन्नवरे, सहकार्यवाह जयश्री पोळ, ज्येष्ठ साहित्यिका उज्वला दिघे, कोषाध्यक्ष सुरेश चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement