Type Here to Get Search Results !

पिंपरीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

* हिंदू मातंग सेना व शिवशाही व्यापारी संघाचा उपक्रम

* लहुजी वस्ताद साळवे यांना महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी पोस्टकार्ड मोहिमेचा संकल्प

पिंपरी / प्रतिनिधी :- समाजप्रबोधनाचे महानायक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथे हिंदू मातंग सेना आणि शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा फुले यांच्या अर्धाकृती स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या समाजसुधारणेतील योगदानाचा गौरव केला. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण यावेळी करून देण्यात आली. हिंदू मातंग सेनेचे मुख्य प्रवक्ते तथा कार्याध्यक्ष युवराज दाखले यांनी यावेळी महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी सांगितले की, महात्मा फुले यांचे आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हजारो पोस्टकार्ड पाठविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.


या कार्यक्रमाला भारतीय लहुजी पँथरचे संस्थापक व अध्यक्ष सदिपान झोंबाडे, आरपीआय (आठवले गट) नेते बाळासाहेब भागवत, साहित्यरत्न लोकशाहीर डॉं. आण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वचे मार्गदर्शक डी. पी. खंडाळे, काशिनाथ हतागळे, युवराज दाखले, अनिल गायकवाड यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement