कोल्हापूर / प्रतिनिधी :- न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या कोल्हापूर जिल्हा महासचिवपदी अशोक शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने यांच्या हस्ते ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
अशोक शेटे यांच्या नियुक्तीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात पत्रकार संघटनेच्या कार्याला नवे बळ मिळणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे काम अधिक संघटित, पारदर्शक आणि प्रभावीपणे राबवले जाईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नियुक्तीनंतर अशोक शेटे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने, राष्ट्रीय महासचिव मानसी गणेश कांबळे, राष्ट्रीय सचिव अनिल पवार, प्रदेश संयोजक अनिलकुमार पालिवाल, कोकण विभाग अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.


Post a Comment
0 Comments