* समाजप्रबोधन, लेखन आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्यपूर्ण भूमिका ; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव
अहिल्यानगर / प्रतिनिधी :- अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील सहकारी गावचे रहिवासी प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांची पत्रकार संघटनेच्या महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेतील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
प्रा. बनसोडे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक प्रश्न, जनसामान्यांच्या समस्या आणि महत्त्वाच्या घडामोडी प्रभावीपणे समाजासमोर मांडत आहेत. विविध दैनिकांमधून ते सातत्याने लेखन करीत असून त्यांच्या लेखनातून समाजप्रबोधनाची ठाम भूमिका दिसून येते. विशेषतः थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त ते प्रेरणादायी लेख लिहून समाजाला जागृत करण्याचे कार्य करीत असतात.
प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे हे छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित आहेत. आंबेडकरी चळवळीत त्यांनी प्रभावी नेतृत्व करीत सामाजिक समतेचा संदेश दिला आहे. त्यांच्या कार्यातून सामाजिक न्याय, शिक्षण आणि परिवर्तनाची भूमिका स्पष्टपणे दिसून येते.
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक वेळा विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजातील विविध घटकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. प्रा. बनसोडे यांच्या या निवडीबद्दल परिसरातून आनंद व्यक्त केला जात असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीतून पत्रकारिता आणि समाजकार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Post a Comment
0 Comments