* जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध - जिल्हाधिकारी विनय गोडा
खुलताबाद / प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नुकतेच पदभार स्विकारलेल्या नूतन जिल्हाधिकारी विनय गोडा (जी.सी.) यांचा खुलताबाद येथे मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराजोद्दीन इफ्तेखारोद्दीन व शेख तकीयोद्दीन इफ्तेखारोद्दीन या दोघा भावांच्या पुढाकारातून हा सत्कार सोहळा पार पडला.
हा सत्कार कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी विनय गोडा यांचे स्वागत केले आणि त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी विनय गोडा यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करीत सांगितले की, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन पूर्णपणे कटीबद्ध आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी गोडा यांनी विकासकामांमध्ये गुणवत्ता राखण्यास प्राधान्य देण्यात येईल, तसेच नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देऊन त्यांचे निराकरण करण्यावर भर दिला जाईल, असेही नमूद केले.


Post a Comment
0 Comments