* पक्ष बळकटीसाठी रणनीती ठरली : प्रभारी विवेक बन्सल, प्रवक्ते अतुल लोंढे यांचे मार्गदर्शन
* गुप्त मुलाखतींद्वारे पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत संघटन मजबूत करण्याचा निर्धार
सिल्लोड / फारूख शेख :- अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे तालुकानिहाय ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. रविवार, 12 एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रभारी विवेक बन्सल, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस धनजंय चौधरी तसेच नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक भोलानाथ कुचनकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगांवकर, तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट पाटील, शहराध्यक्ष फिरोज शेख आणि जिल्हा सरचिटणीस इकबाल अहमद यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
बैठकीत काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे गावागावात प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यात आले. संघटनात्मक कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी विविध सूचना व मते मांडण्यात आली.
या बैठकीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या गुप्त मुलाखती घेण्यात आल्या. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील अडचणी, अपेक्षा आणि संघटनात्मक बदलांविषयी थेट अभिप्राय गोळा करण्यात आला. मिळालेल्या सूचनांच्या आधारे संघटनेत आवश्यक ते बदल करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत जिजाबाई अंभोरे, देवीदास दांडगे, विनायक पाचिंगे, फिरोज मेवाती, वसीम देशमुख, शेख सलीम, रहीम पठाण, इलियास कुरेशी, संजय जाधव, झहीर अहमद, तलहा अहमद, दादाराव शेजुळ, लक्ष्मण शेजुळ, सोमीनाथ माकोडे, तुळशीराम गोरे, गणेश गाडे, शेख जुबेर, शेख रईस, इरफान खान, अशफाक पठाण, शेख अल्तमश, शेख अयान, शेख अमान, जाबेर पठाण, अलीम कुरैशी, सद्दाम पठाण, तोफीक शेख, खलील खान, अल्ताफ खान तसेच अन्य अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.


Post a Comment
0 Comments