Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यातील सरदार एस. के. पवार विद्यालयाला ‘एज्युकेशन लीडरशिप अवॉर्ड’ जाहीर

* प्राचार्य के. एन. काटकर व समन्वयक के. एस. शाह यांच्या कार्याची दखल

* ओलंपियाड उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची उल्लेखनीय प्रगती

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला यंदाचा प्रतिष्ठित एज्युकेशन लीडरशिप अवॉर्ड जाहीर झाला आहे. न्यू दिल्ली येथील सिल्वर झोन ओलंपियाड संस्थेच्या 25 वर्षपूर्ती निमित्त हा सन्मान विद्यालयाचे प्राचार्य के. एन. काटकर आणि ओलंपियाड समन्वयक श्रीमती के. एस. शाह यांना प्रदान करण्यात येणार आहे.

सिल्वर झोन ओलंपियाड संस्था विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर स्पर्धा परीक्षा आयोजित करते. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विषय ज्ञान, सामान्य ज्ञान आणि संगणक ज्ञानाबद्दल आवड निर्माण होत असून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही मोठा फायदा होत आहे. मागील सहा ते सात वर्षांपासून या विद्यालयात नियमितपणे ओलंपियाड परीक्षांचे आयोजन करण्यात येत आहे.


ओलंपियाड समन्वयक श्रीमती के. एस. शाह या विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देत मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेत सहभागी होऊन गोल्ड, सिल्वर आणि ब्राँझ पदके पटकावत आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळेच विद्यालयाची राज्य व राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली आहे.


ओलंपियाड संस्थेने विद्यालयाच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर केला आहे. भारतातील आठ प्रमुख शहरांपैकी एका शहरात लवकरच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनी प्राचार्य व शिक्षकांचा सत्कार करून आनंद व्यक्त केला.


ग्राम शिक्षण समितीचे उपाध्यक्ष सुभाष थेपडे, मानद चिटणीस शिवनारायण जाधव, संचालक किशोर पाटील, आप्पासाहेब पाटील, वामन पाटील, अ. गनी शेख यांच्यासह प्राचार्य, उपप्राचार्य व्ही. बी. गहरवाल, पर्यवेक्षक वाय. डी. ठाकूर, डी. पी. राजपूत आणि सर्व शिक्षकांनी विद्यालयाचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement