* प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट कार्याची दखल ; सेवाभावी योगदानासाठी गौरव
नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक तसेच स्काऊट-गाईड विभाग प्रमुख जी. यू. पवार सर यांचा जळगाव भारत स्काऊट-गाईड जिल्हा संस्थेतर्फे विशेष सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांना गौरविण्यात आले.
शैक्षणिक वर्ष 2025-26 दरम्यान जळगाव जिल्ह्यात स्काऊट-गाईड विभागामार्फत विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली होती. यात स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन, कब मास्टर आणि फ्लॉक लीडर यांसाठी बेसिक तसेच प्रगत प्रशिक्षणांचा समावेश होता. या सर्व प्रशिक्षणांमध्ये जी. यू. पवार सर यांनी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडली.
26 मार्च 2026 रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित कार्यक्रमात जळगाव स्काऊट-गाईड संस्थेतर्फे पवार सरांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली आहे. पवार सरांना मिळालेल्या या सन्मानामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्राम शिक्षण समितीचे उपाध्यक्ष सुभाष थेपडे, मानद चिटणीस शिवनारायण जाधव, संचालक किशोर पाटील, जगन्नाथ पाटील, वामन पाटील, अब्दुल गनी शेख यांच्यासह प्राचार्य के. एन. काटकर, उपप्राचार्य व्ही. बी. गहरवाल, पर्यवेक्षक वाय. डी. ठाकूर, डी. पी. राजपूत आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.


Post a Comment
0 Comments