Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

* युवकांनी राष्ट्र व धर्महितासाठी पुढे यावे - प्रशांत देवरे

* "जात-पात की करो विदाई, हम सब हिंदू भाई-भाई"चा संदेश

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथे आयोजित हिंदू संमेलनात युवकांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घेत राष्ट्र व धर्महितासाठी कार्य करावे, असे आवाहन प्रमुख वक्ते प्रशांत देवरे यांनी केले. या संमेलनात समाजातील एकोपा, संस्कृती संवर्धन आणि युवकांची भूमिका यावर विशेष भर देण्यात आला.

नगरदेवळ्यातील भीमज्योती शाखेत सकल हिंदू समाजाच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रशांत देवरे म्हणाले की, युवकांनी केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत आपले योगदान दिले पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.


कार्यक्रमात उपस्थित असलेल्या ह.भ.प. विलास महाराज यांनी धर्म, संस्कृती आणि परंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी समाजातील मतभेद दूर करून एकत्रितपणे पुढे जाण्याचे आवाहन केले. “एकता आणि समरसता हीच समाजाची खरी ताकद आहे,” असे ते म्हणाले.


संमेलनात “जात-पात की करो विदाई, हम सब हिंदू भाई-भाई” हा संदेश देत सामाजिक समरसतेवर भर देण्यात आला. समाजातील भेदाभेद दूर करून सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश महाजन यांनी केले, तर सूत्रसंचालन बाबरकर सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवक आणि नागरिक उपस्थित होते. या संमेलनात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. देशभक्तीपर वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने युवकांना समाजकारण व राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement