Type Here to Get Search Results !

जळगाव जिल्हा परिषद सिईओ मिनल करनवाल यांची बदली ; करिश्मा नायर यांची नियुक्ती



* राज्यात 11 IAS अधिकाऱ्यांचे मोठे फेरबदल

जळगाव / प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करीत जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची बदली केली आहे. त्यांची नियुक्ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई येथे प्रकल्प संचालक म्हणून करण्यात आली आहे. त्याचबरोबर नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

* राज्यात मोठ्या प्रमाणावर बदली :- राज्य सरकारने एकूण 11 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल सुरू असल्याचे दिसून येत आहे. सात दिवसांपूर्वीही काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती आणि तुकाराम मुंडे यांच्या बदलीनंतर पुन्हा एकदा व्यापक स्तरावर निर्णय घेण्यात आले आहेत.


राहुल रंजन महीवाल यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे सदस्य सचिवपदी नियुक्ती, श्वेता सिंघल यांची नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे विशेष निवासी आयुक्त म्हणून नियुक्ती, रुचेश जैवंशी यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती, कान्हूराज बगाते। यांची महावितरण (कल्याण) येथे संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


* महत्त्वाच्या विभागांमध्ये फेरबदल :- लक्ष्मण राऊत यांची महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती, गितांजली बाविस्कर, यांची मंत्रालयातील नियोजन विभागात सहसचिव म्हणून बदली, डॉं. दिलीप जगदाळे यांची पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात सहसचिव म्हणून नियुक्ती, पंकज देवरे यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई येथे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अमित रंजन यांची नाशिक महापालिकेत अतिरिक्त आयुक्त व करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement