Type Here to Get Search Results !

किल्ले रायगड येथे एनडीआरएफकडून रोप-वे रेस्क्यू मॉक ड्रिल संपन्न

रायगड / प्रतिनिधी :- किल्ले रायगड येथे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने National Disaster Response Force (NDRF) यांच्या मार्फत रायगड रोप-वे रेस्क्यू ऑपरेशनची मॉक एक्सरसाइज (7 एप्रिल रोजी) यशस्वीरित्या पार पडली. या सरावाचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि समन्वयित प्रतिसाद देण्याची क्षमता वाढविणे हा होता. या मॉक ड्रिलमध्ये रोप-वेवरील संभाव्य अपघात गृहित धरून बचावकार्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करण्यात आली. प्रशिक्षित जवानांनी अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने अडकलेल्या प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्याची प्रक्रिया दाखवून दिली.

या उपक्रमात Indian Air Force, भारतीय सेना, State Disaster Response Force (धुळे व नागपूर), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, उप विभागीय अधिकारी महाड, तहसीलदार महाड, आपदा मित्र, रायगड रोप-वे प्रशासन, आरोग्य विभाग तसेच महाड अग्निशमन दल यांचा सहभाग होता.


सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधत अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावीरीत्या ही मॉक एक्सरसाइज पूर्ण केली. अशा प्रकारच्या सरावांमुळे प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी होणारी हानी कमी करण्यास मदत होणार असून प्रशासनाची तयारी अधिक भक्कम होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement