Type Here to Get Search Results !

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा

* तापमान 41°C पार : उष्णतेच्या लाटेचा इशारा

* काही दिवसांत पारा 43°C पर्यंत जाण्याची शक्यता

जळगाव / प्रतिनिधी :- जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून आज तापमानाचा पारा थेट 41.8°C वर पोहोचला आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून हवामान खात्याने पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे.

आज जिल्ह्यातील हवामान कोरडे आणि उष्ण राहिले. कमाल तापमान 41.8°C तर किमान तापमान 27.8°C वर पोहचले होते. वाऱ्याचा वेग 9 ते 11 किमी/तास राहिला. हवेत आर्द्रता 12% (कोरडी हवा) होती. आर्द्रता अत्यंत कमी असल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून उष्माघाताचा धोका वाढला आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होऊन पारा 42°C ते 43°C दरम्यान जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट (Heatwave) तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे हवामान विभागाने खबरदारी म्हणून दुपारी 12 ते 4 या वेळेत काम नसेल तर घराबाहेर पडणे टाळावे. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी, लिंबू सरबत किंवा ताकाचे सेवन करावे, शक्यतो हलकी, सैल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा, बाहेर जाताना टोपी, छत्री किंवा गॉगलचा वापर करा, लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.


तापमान सतत वाढत असल्याने उष्माघात, डिहायड्रेशन, चक्कर येणे यांसारख्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असून योग्य खबरदारी घेतल्यास उष्णतेच्या दुष्परिणामांपासून बचाव होऊ शकतो.

आज जिल्ह्यातील हवामान कोरडे आणि उष्ण राहिले.

कमाल तापमान : 41.8°C

किमान तापमान : 27.8°C

वाऱ्याचा वेग : 9 ते 11 किमी/तास

हवेतील आर्द्रता : 12% (कोरडी हवा)

स्थिती : आकाश निरभ्र, प्रखर सूर्यप्रकाश

आर्द्रता अत्यंत कमी असल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून उष्माघाताचा धोका वाढला आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement