Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ नगरदेवळा - कजगावकडून पत्रकार फिरोज पिंजारी यांचा सत्कार

* 'निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026’ने सन्मानित झालेल्या पत्रकार फिरोज पिंजारी यांच्या कार्याचा गौरव

नगरदेवळा / प्रतिनिधी :- अन्यायाविरुद्ध बुलंद आवाज उंचावणारे आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेचा वसा जपणारे दै. कोकण प्रदेश न्यूज व केपी न्यूजचे मुख्य संपादक पत्रकार फिरोज पिंजारी यांना नुकताच ‘निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026’ हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला. या उल्लेखनीय यशाबद्दल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कजगाव व नगरदेवळा येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

गुरुवार, 9 एप्रिल 2026 रोजी कोल्हापूर येथील दसरा चौकातील श्री शाहू स्मारक भवन येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात फिरोज पिंजारी यांना ‘निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या निर्भीड, निडर आणि जनहितासाठी कटीबद्ध पत्रकारितेची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.


या यशाची दखल घेत कजगांव येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन आणि कजगाव शहर अध्यक्ष आमीन शाह यांच्या हस्ते फिरोज पिंजारी यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करीत पत्रकारितेतील योगदानाचा गौरव केला.


नगरदेवळा येथेही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पिंजारी यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. उपस्थितांनी त्यांच्या लेखणीतील धार, सामाजिक बांधिलकी आणि अन्यायाविरुद्धची भूमिका यांचे विशेष कौतुक केले. या सत्कार सोहळ्यास शांताई क्लिनिक संचालक डॉं. युवराज गढरी, पोलिस टाईम्स वृत्तपत्राचे पत्रकार फारुख शेख, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे नगरदेवळा शहराध्यक्ष शाह जावेद बशीर, शाह इंटरप्राईजेसचे सद्दाम शाह, सुनील चौधरी, योगेश क्रिएटिव्हचे योगेश पाटील, मोरया मेन्स वेअरचे अजय शिरुडे, आई क्लिनिकल लॅबोरेटरीचे अनिल सुरगुले आदी मान्यवर उपस्थित होते.


फिरोज पिंजारी यांनी आपल्या पत्रकारितेतून समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आहे. त्यांच्या लेखणीतील धार आणि जनतेच्या प्रश्नांशी असलेली बांधिलकी यामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या सन्मानानंतर पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून फिरोज पिंजारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement