* नगरदेवळ्यात बालकांना सर्जनशीलतेची संधी
* शिवकन्या बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम
* 6 ते 10 वयोगटातील मुलांसाठी विशेष स्पर्धा
नगरदेवळा / प्रतिनिधी :- क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवकन्या बहुउद्देशीय संस्था, नगरदेवळा यांच्या वतीने बालकांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांमधील सर्जनशीलता, कलागुण आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ही रंगभरण स्पर्धा 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता संत सावता माळी मंगल कार्यालय, नगरदेवळा येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत 6 ते 10 वयोगटातील मुलांना सहभागी होता येणार आहे.
या स्पर्धेमुळे लहान मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्याची संधी मिळणार असून रंगांच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची प्रेरणा मिळणार आहे. अशा उपक्रमांमुळे बालकांमध्ये कला, संस्कार आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होण्यास मदत होते. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून सहभागी सर्व मुलांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन शिवकन्या बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष अभिलाषा आशा भिला रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. नगरदेवळा व परिसरातील पालकांनी आपल्या मुलांना या स्पर्धेत सहभागी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments