* SIR संदर्भात सखोल मार्गदर्शन : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आयोजन
* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण
जळगाव / प्रतिनिधी :- शिवसेना उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आयोजित या कार्यशाळेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेत SIR (विशेष उपक्रम /नियोजन) संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली असून, संघटनात्मक बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला.
कार्यशाळेस शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख आमदार दिलीप लांडे, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख आमदार तुकाराम काटे, पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील, चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे, साक्रीचे आमदार मंजुळा गावित, आमदार आमशा पाडवी, धाराशिव संपर्क प्रमुख माजी खासदार उन्मेश पाटील, नंदुरबार लोकसभा प्रमुख माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, वासुदेव पाटील, विष्णु भंगाळे यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेत SIR उपक्रमाची उद्दिष्टे, अंमलबजावणी प्रक्रिया, तसेच संघटनात्मक स्तरावर त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी या उपक्रमाची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यशाळेत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका घ्यावी, जनतेशी संपर्क वाढवावा आणि पक्षाच्या धोरणांची प्रभावी मांडणी करावी, अशा सूचना मान्यवरांनी दिल्या.


Post a Comment
0 Comments