Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात पाणीपुरवठ्याच्या विहिरीत मृत घोरपड

* वार्ड 3 व 4 ला पाणी देणाऱ्या विहिरीतील प्रकार ; तत्काळ उपाययोजना

* विहिरींची नियमित तपासणी व स्वच्छतेबाबत नागरिकांचे प्रश्न उपस्थित

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथील वार्ड क्रमांक 3 आणि 4 ला पाणीपुरवठा करणाऱ्या 291 क्रमांकाच्या विहिरीमध्ये 7 एप्रिल 2026 रोजी मृत घोरपड आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पाहता पाहता ही घटना गावभर पसरली. दरम्यान, घोरपड विहिरीत मृत अवस्थेत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ याची माहिती दिली. त्यानंतर शिवसेनेचे युवा नेते धनराज (आबा) चौधरी यांनी धाडस दाखवत स्वतः विहिरीत उतरून मृत घोरपड बाहेर काढली.

घटनेनंतर संबंधित विहिरीतील पाणी उपसून टाकण्यात आले. तसेच पाण्याची शुद्धता राखण्यासाठी आवश्यक रसायन (पावडर) टाकण्यात आले. सरपंच प्रतिक्षा किरण काटकर यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी किरण काटकर, रज्जाक शेख, धनराज चौधरी, मुझफ्फर सय्यद, पत्रकार हसीबूर शेख तसेच पाणीपुरवठा कर्मचारी पिंटू यांची उपस्थिती व सहकार्य लाभले.


घटनेनंतर नागरिकांकडून पाणीपुरवठ्यापूर्वी विहिरींची नियमित तपासणी केली जाते का ? विहिरींची स्वच्छता वेळोवेळी केली जाते का ? अशा घटना टाळण्यासाठी कोणती कायमस्वरूपी यंत्रणा आहे का ? असे गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. वेळीच उपाययोजना करण्यात आल्याने संभाव्य मोठा धोका टळला असला तरी या घटनेमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेतील निष्काळजीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement