Type Here to Get Search Results !

निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा देदीप्यमान यशोत्सव

* इयत्ता 10 वीमध्ये 100% निकाल

* युगंधर भोसले 97% सह प्रथम

* 25 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गुण

पाचोरा / प्रतिनिधी :- सीबीएसई बोर्डाच्या फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये झालेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेत निर्मल इंटरनॅशनल स्कूलने 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत दिमाखदार यश संपादन केले आहे. शाळेतील सर्व 131 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या यशामुळे पाचोरा तालुक्याचा मान उंचावला आहे.

या परीक्षेत 25 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे हा विक्रम साध्य झाला आहे. युगंधर दिनेश भोसले 97% (प्रथम क्रमांक), समीक्षा सुनील महाजन – 96.80% (द्वितीय क्रमांक), चैताली बापू पाटील 95% (तृतीय क्रमांक) या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत शाळेच्या गुणवत्तेला नवा उंचाव दिला आहे.


या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा वैशालीताई सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी आय. बी. सिंग, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, समन्वयक स्नेहल पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत या यशामागे शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची जिद्द व परिश्रम कारणीभूत असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement