Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात शहीद भैय्यासाहेब बागुल यांना भावपूर्ण अभिवादन

* स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन

* विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गावचे सुपुत्र व शूर सैनिक शहीद भैय्यासाहेब रोहिदास बागुल यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम श्रद्धापूर्वक पार पडला. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

भैय्यासाहेब बागुल हे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. भारतीय सैन्यात सेवेत असतांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 30 मार्च 2000 रोजी त्यांनी वीरमरण पत्करले. त्यांच्या शौर्यगाथेमुळे नगरदेवळा गावाचा मान उंचावला असून, ते आजही तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.


प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही विद्यालयात त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्यांच्या कार्याचा गौरव करीत देशसेवेची भावना जोपासण्याचा संदेश दिला. शहीद जवानांचे बलिदान विसरता कामा नये, असे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. या कार्यक्रमास प्राचार्य किरण काटकर, उपप्राचार्य व्ही. बी. गहरवाल, पर्यवेक्षक वाय. डी. ठाकूर, डी. पी. राजपूत यांच्यासह दोन्ही सत्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement