Type Here to Get Search Results !

न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र महिला विभाग अध्यक्षपदी सुनीता महाडीक यांची नियुक्ती


* नवविचार न्यूज संपादिका महाडीक यांच्यावर संघटनेची मोठी जबाबदारी

चाळीसगाव / प्रतिनिधी :- न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र महिला विभाग अध्यक्षपदी नवविचार न्यूजच्या संपादिका सुनीता राजेंद्र महाडीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने यांच्या हस्ते ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

सुनीता महाडीक यांच्या नियुक्तीमुळे उत्तर महाराष्ट्र व खान्देशातील पत्रकार संघटनेच्या कार्याला नवे बळ मिळणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे काम अधिक संघटित, पारदर्शक आणि प्रभावीपणे राबवले जाईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


नवनियुक्त अध्यक्ष सुनीता महाडीक यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी ठामपणे आवाज उठविणे, तरुण पत्रकारांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडणे हे माझे प्राधान्य असेल. पत्रकार बांधवांमधील एकोपा वाढवून सत्यनिष्ठ पत्रकारितेला बळ देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.


नियुक्तीनंतर सुनीता महाडीक यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने, राष्ट्रीय महासचिव मानसी गणेश कांबळे, राष्ट्रीय सचिव अनिल पवार, प्रदेश संयोजक अनिलकुमार पालिवाल, कोकण विभाग अध्यक्ष राजेंद्र जाधव, रावेर लोकसभा अध्यक्ष योगेश महाजन यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement