* ‘धाराऊ’ चित्रपटामुळे गावाचे नाव जागतिक पातळीवर
* राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर १६ नामांकने व ६ पुरस्कार मिळवणाऱ्या चित्रपटाच्या यशाचा सन्मान
पौड (ता. मुळशी) / प्रतिनिधी :- आई उमराई देवी उत्सव 2026 निमित्त विठ्ठलवाडी, पौड (ता. मुळशी) येथे ग्रामस्थांच्या वतीने लेखक-दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या ‘धाराऊ’ या चित्रपटाच्या यशामुळे गावाचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याने हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
मनिष शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला ‘धाराऊ’ हा चित्रपट भारतीय शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात गोमातेचे असलेले महत्त्व अधोरेखित करणारा आहे. ग्रामीण वास्तव, शेतकरी जीवनातील संघर्ष आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल 16 नामांकने आणि 6 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, चित्रपटसृष्टीत त्याची मोठी उत्सुकता आहे.
‘धाराऊ’च्या यशामुळे विठ्ठलवाडी गावाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे. गावातील एका तरुणाने आपल्या कलेच्या बळावर गावाचा लौकिक वाढविल्याबद्दल ग्रामस्थांनी अभिमान व्यक्त केला. या यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मनिष शिंदे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा सन्मान केवळ शिंदे यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी चंद्रकांत शिंदे, दिनकर भोयने, मारुती शिंदे, प्रकाश शिंदे, मनोहर भोयने, मोहनशेठ जाधव, महेश शिंदे, गणेश वीर, प्रवीण भोयने, सुरेश ओंबळे, राकेश शिंदे, संतोष घोलप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments