Type Here to Get Search Results !

पनवेल येथे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

* सारनाथ बौद्ध विहार, विचुंबे येथे दिवसभर मार्गदर्शन

पनवेल / रामदास धो. गमरे :- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) रत्नागिरी जिल्हा व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर रविवार, 29 मार्च 2026 रोजी नवीन पनवेल येथील सारनाथ बौद्ध विहार, विचुंबे येथे उत्साहात पार पडले. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत चाललेल्या या शिबिरात जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बौद्धाचार्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

शिबिरात संघटनात्मक कार्याची उभारणी, बौद्ध धम्माचा प्रसार आणि कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी समाजकार्य अधिक प्रभावीपणे कसे करावे, संघटनेची ताकद कशी वाढवावी आणि धम्म विचार अधिक व्यापक पातळीवर कसा पोहोचवावा यावर विशेष भर देण्यात आला. या शिबिराचे अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी जिल्हा मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक प्रशांत गडकरी यांच्या हस्ते झाले. मुंबई प्रदेशचे प्रचार पर्यटन सचिव सुनिल बनसोडे यांनी संघटनात्मक बांधणी, सामाजिक कार्य आणि धम्मप्रसार यावर प्रभावी मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस संदेश कांबळे यांनी प्रभावी शैलीत केले, तर आभार जिल्हा संस्कार उपाध्यक्ष विजय कांबळे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा कोषाध्यक्ष संजय वि. कांबळे आणि बौद्धाचार्य मनोज पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रशिक्षण शिबिरात जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, संगमेश्वर व लांजा तालुका प्रतिनिधी, बौद्धाचार्य तसेच समता सैनिक दलाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement