* कोल्हापूरात रंगला भव्य पुरस्कार सोहळा
* मंथन फाऊंडेशनतर्फे जिल्हास्तरीय उपक्रम
कोल्हापूर / प्रतिनिधी :- कोल्हापूर येथे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी भव्य जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते सागर शेळके यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती सारिका यशवंत नांदेकर या होत्या, तर प्रमुख वक्ते म्हणून शिवराज कॉलेज, गडहिंग्लजचे संस्थापक प्रा. किसनराव कुराडे यांनी मार्गदर्शन केले.
मंथन फाऊंडेशन, कपिलेश्वर यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अनेकांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि शाल देऊन गौरविण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक कार्यकर्ते सागर शेळके यांच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, पत्रकारिता, महिला सक्षमीकरण, उद्योग तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा यावेळी विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. विशेष म्हणजे पुरस्कार वितरणापूर्वी कार्यक्रमाच्या नियोजनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कार्यकर्ते आणि कलाकारांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली.
या सोहळ्यात जितेंद्र मोहन चोकाककर यांना "आदर्श राज्य क्रीडा सहकार गौरव पुरस्कार", ह.भ.प. शिवाजी शांताबाई विठ्ठल चौगुले यांना "आदर्श प्रेरणादायी व्यक्तिमत्व पुरस्कार", दयानंद गणपती निकम यांना "सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व पुरस्कार", तसेच शशिकांत जयसिंग लिंबारे (वरळी, मुंबई) यांना "समाजहित पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026" प्रदान करण्यात आला.
आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीरेंद्र रमेश जोईल यांना "आरोग्य संरक्षण दूत पुरस्कार 2026" तर विशाल आनंदराव जाधव (नवी मुंबई) यांना "वैद्यकीय सेवा समाजभूषण पुरस्कार 2026" देऊन गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या पल्लवी दीपक सकपाळ यांना "आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2026" प्रदान करण्यात आला.
ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या अनेक महिलांचा देखील सन्मान करण्यात आला. यामध्ये नंदा शिवाजी यादव, जयशीला माधव सूर्यवंशी, मेघा शिवाजी चौगुले, सोनम तुषार चिखलकर, सुनंदा मारुती माने, प्रज्ञा प्रदीप मेढे, सरिता उत्तम जाधव यांसह अनेक महिलांना विविध "नारी शक्ती" आणि सक्षमीकरण पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
पत्रकारिता, समाजसेवा आणि युवक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनाही या सोहळ्यात विशेष सन्मान देण्यात आला. पत्रकार फिरोज पिंजारी (कर्जत), काळुराम पांडुरंग लांडगे (पुणे), किरण दगडू पवार, स्वप्निल साताप्पा कांबळे, चंद्रकांत गेनू साळुंके यांसह अनेकांना विविध गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. याशिवाय औद्योगिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही गौरविण्यात आले. संभाजी रामचंद्र चव्हाण, तानाजी वसंत सावंत, रोहन अनिल भोसले, तुषार शरद येडके, सौरभ विराज सुतार, शिवाजी सुतार यांना "परंपरागत कला गौरव पुरस्कार 2026" प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉं. आश्लेषा चव्हाण, सोनल सुतार, सुप्रिया गोरे, साक्षी गोरे, मोहिनी माने, सुमन सुतार, रजिया आगा, मनाली कुलकर्णी, लखन कांबळे, प्रदीप मेढे, प्रिया गोंधळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. महाराष्ट्र ब्लॅक कमांडो फोर्स व स्थानिक युवकांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ज्योती गायकवाड आणि सचिन वाडकर यांनी केले. संपूर्ण सोहळ्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आयोजकांवर कौतुकाचा वर्षाव केला.



Post a Comment
0 Comments