* MBBS पूर्ण करून पदवीदान समारंभात गौरव
* शैक्षणिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या कुटुंबातील आणखी एक डॉंक्टर ; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
नगरदेवळा / सय्यद मुजफ्फर अली :- नगरदेवळा येथील पेन्शनर केंद्र प्रमुख हाजी अ. मजीद अ. रशीद यांचे नातू शेख कामरान शेख हारुन यांनी नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून अप्रेंटीसशिपही पूर्ण केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान समारंभात त्यांना अधिकृतपणे पदवी प्रदान करण्यात आली असून त्यांच्या या यशाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
कामरान हे शिक्षण परंपरा जपणाऱ्या कुटुंबातून येतात. वडील डॉं. शेख हारुन शेख बशीर हे इकरा उर्दू माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सन 2012 मध्ये माजी राष्ट्रपती कै. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक’ राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आई शबाना परवीन शेख हारुन या प्रेमाबाई जैन उर्दू प्राथमिक शाळा, जळगाव येथे उपशिक्षिका असून त्या एम.ए. बी.एड. पदवीधर आहेत. तसेच त्या सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा यांच्या माजी विद्यार्थिनी आहेत.
कामरान यांच्या कुटुंबात शिक्षणाची समृद्ध परंपरा दिसून येते. मोठी बहीण इरम फातेमा BDS, सध्या अबुधाबी येथे कार्यरत आहे. दुसरी बहीण तझीन फातेमा MBBS, MS (सर्जन), अंधेरी (मुंबई) येथे कार्यरत आहे. तिसरी बहीण मिदत फातेमा MBBS, सध्या जालना बदनापूर येथे MD (बालरोगतज्ज्ञ) शिक्षण घेत आहे तर धाकटा भाऊ रशिया येथे MBBS शिक्षण घेत आहे.
कामरान यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्र परिवार आणि समाजातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांचे मामा शेख खलील अ. मजीद (केंद्र प्रमुख, भडगाव), शेख इकबाल अ. मजीद (उपशिक्षक, सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा) यांनीही त्यांचे विशेष अभिनंदन करून उज्ज्वल भवितव्यासाठी आशिर्वाद दिले आहेत.


Post a Comment
0 Comments