Type Here to Get Search Results !

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सोमवारी घेणार राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई / प्रतिनिधी :- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे. उद्या सोमवार, 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या तिस-या टर्मच्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातुन राज्यसभेवर 7 खासदार बिनविरोध निवडुन गेले आहेत. त्यात ना. रामदास आठवले यांचा समावेश आहे. राज्यसभेवर सलग तिस-यांदा बिनविरोध निवड होवून ना. आठवले यांनी राज्यसभा खासदार म्हणून हॅट्रीक केलेली आहे. 

ना. रामदास आठवले यांची एप्रिल 2014 ला सर्वप्रथम राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर एप्रिल 2020 मध्ये दुस-यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल 2020 ते 2 एप्रिल 2026 पर्यंत त्यांच्या दुस-या टर्मची मुदत होती. 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत ना. आठवले आपल्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर राज्यसभेच्या त्यांच्या तिस-या टर्मला सुरुवात होणार आहे. 6 एप्रिल 2026 ते एप्रिल 2032 पर्यत ना. आठवले यांची राज्यसभेत तिसरी टर्म राहणार आहे. 


तिस-यांदा राज्यसभेत निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे देशभरातील दलित, बहुजनांनी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन केले आहे. ना. आठवले यांना तिस-यांदा राज्यसभेवर निवडुन दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यभरातील आंबेडकरी रिपब्लिकन जनतेतर्फे हार्दिक आभार मानले जात आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement