Type Here to Get Search Results !

नगरदेवळा प्रकरणात तोडगा अन् पत्रकार एकीचा विजय

* पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांची मध्यस्थी यशस्वी

* माजी ग्राम पंचायत सदस्य विनोदसिंग परदेशी यांच्याकडून माफी 

* जावेद शाह यांनी पाठींबा देणाऱ्या सर्व पत्रकार, संघटना, सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांचे आभार 

पाचोरा-भडगाव / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथील पत्रकार वाद प्रकरण अखेर पत्रकारांच्या एकीमुळे आणि पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मार्गी लागले असून माजी ग्रामपंचायत सदस्य विनोदसिंग परदेशी यांनी आपली चूक मान्य करीत लेखी माफी मागितली आहे. या घडामोडींमुळे तणावपूर्ण वातावरण शांत होत प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे.

पाचोरा पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन यांनीही मध्यस्थीची भूमिका पार पाडत संवादातून तोडगा काढण्यास मदत केली. बैठकीदरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य विनोदसिंग परदेशी यांनी आपली चूक मान्य करीत पत्रकारांशी झालेल्या वादाबद्दल लेखी माफी सादर केली. तसेच भविष्यात अशा प्रकारची घटना घडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी पोलिस प्रशासन आणि पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले.


या प्रकरणात पत्रकारांनी दाखविलेली एकजूट आणि संघटित भूमिका महत्त्वाची ठरली. पत्रकारांच्या एकीमुळेच हा वाद शांततेत मार्गी लागल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणी पत्रकार जावेद शाह यांनी मध्यस्थी करणारे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन तसेच वृत्त प्रभातचे मुख्य संपादक फारूख शाह नौमाणी, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ भडगाव तालुका अध्यक्ष निलेश महाले, सचिव यश कुमार पाटील, डॉं. बी. बी. भोसले, हर्षल चौधरी, शशिकांत भागवत तायडे, अखिल भारतीय पत्रकार संघ कजगाव शहर अध्यक्ष आमीन शाह, संभाजी युगराज पाटील, आशुतोष कुमार, भावेश पाटील, दीपक अमृतकार, संजय पांडुरंग कोतकर, भरत शिवाजी चव्हाण, अमिन पिंजारी, गुलाब नेरपगार, सारथी महाराष्ट्राचा न्यूज प्रतिनिधी हसीबूर शेख, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष तथा दै. कोकण प्रदेश न्यूज (केपी न्यूज) मुख्य संपादक फिरोज पिंजारी, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने, राष्ट्रीय महासचिव मानसी कांबळे, सचिव अनिल पवार, कोकण प्रदेश अध्यक्ष राजेंद्र जाधव, साप्ताहीक वृत्त प्रभातचे अलीम शेख (फैजपूर), नजीर शेख (चिनावल), मनीष परदेशी (सावदा), हाफिज शेख (चोपडा), अझर शेख (चोपडा), महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, नगरदेवळा येथील पत्रकार दिपक (सोनू) परदेशी, पोलिस टुडेचे प्रतिनिधी फारूख शेख, नगरदेवळा ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच विनोद राऊळ, माजी ग्राम पंचायत सदस्य अन्नू मेंबर, ग्रामपंचायत सदस्य व चेअरमन नूर बेग, पीएसआय योगेश गणगे, सहाय्यक फौजदार निवृती मोरे, पोलिस कर्मचारी दिनेश पाटील, हेडकॉन्स्टेबल व तपास अधिकारी हरीश अहिरे, कॉन्स्टेबल वैभव पाटील, कॉन्स्टेबल मजीद पठाण, विविध पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत पाठिंबा देणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचे विशेष आभार त्यांनी व्यक्त केले.

प्रकरण तणावपूर्ण स्वरूप धारण करण्याची शक्यता असतांना ते संवादाच्या माध्यमातून आणि शांततेच्या मार्गाने निकाली निघाल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही यामुळे अधोरेखित झाला असून, अशा घटनांवर वेळीच तोडगा काढण्याची गरजही अधोरेखित झाली आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement