Type Here to Get Search Results !

आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीत भव्य रक्तदान शिबिर

* शिवसेनेचा सामाजिक उपक्रम ; कामगारांना किट वाटप व विद्यार्थ्यांचा ही गौरव होणार

खोपोली / फिरोज पिंजारी :- कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोली शहर शिवसेनेच्या वतीने 6 एप्रिल 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून समाजोपयोगी कार्याचा संदेश देत नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

रक्तदान शिबिर महाराजा मंगल कार्यालय, खोपोली येथे सोमवार, 6 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते होणार असून खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


या कार्यक्रमात केवळ रक्तदान शिबिरच नव्हे, तर नोंदणीकृत कामगारांना शासनामार्फत गृहउपयोगी किटचे वाटप, IESP विद्यार्थ्यांचा गुणगौरव व प्रमाणपत्र वितरण अशा विविध उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.


या कार्यक्रमासाठी खोपोली शहर शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, माजी-विद्यमान लोकप्रतिनिधी, नगरसेवक-नगरसेविका आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement