कोल्हापूर / प्रतिनिधी :- गेल्या साडेसात दशकांपासून विश्वासार्हता आणि उत्कृष्ट कलाकुसरीचा वारसा जपणाऱ्या 'जगन्नाथ गंगाराम पेडणेकर' (जेजीपी) ज्वेलर्सच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील त्यांच्या सर्व 24 दालनांना 'इंडियन असोसिएशन फॉर गोल्ड एक्सलन्स अँड स्टँडर्ड्स' (आयएजीईएस) तर्फे अधिकृत मानांकन प्रदान करण्यात आले आहे. यामुळे दागिन्यांच्या शुद्धतेसोबतच आता पारदर्शक व्यवहार आणि नैतिक व्यवसायावरही शिक्कामोर्तब झाले आहे.
भारतीय सुवर्ण बाजारपेठ सध्या मोठ्या प्रमाणावर औपचारिकीकरणाकडे वाटचाल करीत आहे. या पार्श्वभूमीवर, ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आयएजीईएस हे एक स्व-नियमनकारी संस्था म्हणून काम करते. त्रयस्थ संस्थेद्वारे व्यवसायाच्या सर्व निकषांची सखोल तपासणी केल्यानंतरच हे मानांकन दिले जाते.
सन 1950 मध्ये स्थापना झालेल्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सने 75 वर्षांहून अधिक काळ पिढ्यानपिढ्या ग्राहकांचे मन जिंकले आहे. या मानांकनाबद्दल बोलताना संचालक आनंद पेडणेकर म्हणाले की, आमचा ब्रँड हा विश्वास, सत्यता आणि पारदर्शकतेच्या खांबावर उभा आहे. आयएजीईएस मानांकनामुळे आमच्या नैतिक सोर्सिंग आणि पारदर्शक व्यवसाय पद्धतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. सुवर्ण उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
आयएजीईएस मानांकन असलेल्या सराफाकडून सोने खरेदी करणे म्हणजे गुणवत्तेची हमी आहे. आयएजीईएसचे सीईओ कौशलेंद्र सिन्हा यांनी सांगितले की, पेडणेकर ज्वेलर्सचे स्वागत करतांना आम्हाला आनंद होत आहे. आमची #PehlaCheckIAGES ही मोहीम ग्राहकांना सोने खरेदीपूर्वी योग्य पडताळणी करण्यास प्रोत्साहित करते.


Post a Comment
0 Comments