Type Here to Get Search Results !

महात्मा फुले जयंतीनिमित्त खोपोलीत भव्य रथयात्रा व बाईक रॅली

* शिळफाटा ते बाजारपेठ मार्गे रथयात्रा ; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

खोपोली / दिनकर भुजबळ :- समाजप्रबोधनाचे महानायक महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त खोपोली शहरात शनिवार, 11 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता भव्य रथयात्रा आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रेरणादायी उपक्रमात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महात्मा फुले जयंती समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या रथयात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, शिळफाटा येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून होणार आहे. त्यानंतर शिळफाटा ते खोपोली बाजारपेठ मार्गे रथयात्रा आणि बाईक रॅली काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा समारोप खोपोली येथील डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून करण्यात येणार आहे.


रथयात्रा व बाईक रॅली शांततेत आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी समितीने विशेष नियोजन केले आहे. वाहतूक नियंत्रण, स्वयंसेवकांची नेमणूक आणि सुरक्षा व्यवस्थेची योग्य काळजी घेतली जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमाचे आयोजन महात्मा फुले जयंती समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले असून अध्यक्ष महेश काजळे, उपाध्यक्ष मोहन केदार, सेक्रेटरी गणेश राक्षे, समन्वयक राजेंद्र फक्के, वर्षा मोरे, ज्योती भुजबळ आदी पदाधिकारी यासाठी सक्रियपणे काम करत आहेत.


समाजप्रबोधनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या रथयात्रा व बाईक रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन निमंत्रक दिनकर भुजबळ यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement