* विद्यार्थ्यांच्या भाषणातून महात्मा फुले यांच्या कार्याचा जागर
परभणी / प्रतिनिधी :- श्री संचारेश्वर विद्यालयात आज 11 एप्रिल 2026 रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुमती भारती उपस्थित होत्या.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर भाषण करीत त्यांच्या समाजसुधारणेतील योगदानाचा आढावा मांडला. शिक्षण, समता आणि स्त्री-शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बाळासाहेब ठोंबरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवाजी सोमोसे, किरण नाईक, संजय गायकवाड, बाळासाहेब ठोंबरे, कृष्णा मुसळे, विवेक मुक्कावार, प्रल्हाद वैरागर, गंगाधर पांचाळ, उषा खराबे, विजयमाला फड, रूपाली सोनसळे, वर्षा गणगे, दिपाली देशपांडे, अंजली जावळे, मनिषा धाबेवार, मोनिका घोडके, राणूबाई सुग्रामकर, अश्विनी पांडे तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.


Post a Comment
0 Comments