Type Here to Get Search Results !

भक्तीचा मळा फुलला!

* मोरया मेन्स वेअरच्या संचालकांची वारकरी संप्रदायाची दीक्षा

* तुळशीमाळ परिधान करून अध्यात्माचा स्विकार

*व्यवसायासोबत संस्कृतीची जपणूक करण्याचा प्रेरणादायी संदेश

नगरदेवळा / प्रतिनिधी :- “तुळसीमाळ गळा, गोपीचंदन टिळा… ह्रदयी कळवळा वैष्णवाचा…” या संतवचनांना साजेसा भक्तीमय सोहळा नगरदेवळ्यात अनुभवायला मिळाला. 16 एप्रिल 2026 रोजी ‘मोरया मेन्स वेअर’ परिवारातील संचालकांनी वारकरी संप्रदायाची अधिकृत दीक्षा स्विकारत गळ्यात तुळशीची माळ परिधान केली. या सोहळ्यामुळे परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

पीएसआय योगेश गणेगे यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून हा भक्तीमय सोहळा पार पडला. यावेळी ‘मोरया मेन्स वेअर’चे संचालक अजय शिरूडे, ज्ञानेश्वर जगताप, संतोष सोनार, दीपक वाडेकर यांनी ह.भ.प. योगेश महाराज धामणगावकर यांच्या शुभहस्ते तुळशीची माळ परिधान करून वारकरी संप्रदायात प्रवेश केला.


व्यवसायाच्या धकाधकीच्या जीवनातही अध्यात्माची जोड देत संस्कृती, परंपरा आणि मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पीएसआय योगेश गणेगे यांच्या प्रेरणेने हा निर्णय घेतल्याबद्दल सर्व स्तरातून या संचालकांचे कौतुक होत आहे. या प्रसंगी ह.भ.प. योगेश महाराज धामणगावकर म्हणाले की, “केवळ कपाळावर टिळा आणि गळ्यात माळ घालणे म्हणजे वारकरी होणे नव्हे, तर अंतःकरणात भूतदया, परोपकार आणि साधेपणा जपणे हाच खरा वारकरी धर्म आहे.”


या सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून तरुण पिढीने व्यवसायासोबत अध्यात्माची सांगड कशी घालावी, याचा आदर्श मोरया मेन्स वेअरच्या संचालकांनी घालून दिला आहे. अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवा यांचा संगम साधणारा हा उपक्रम नगरदेवळ्यासाठी निश्चितच अभिमानास्पद ठरला आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement