ज्योतिराव फुले नाव घेता पेटते ज्योत,
अन्यायाविरुद्ध उभा राहिला ते सतत।
ज्ञानाचा दीप ज्योतिबांनी लावला,
अंधार सारा दूर पळाला।
शिक्षणाचा हक्क दिला सर्वांना,
नवा मार्ग दाखविला जनांना।
स्त्रियांच्या जातीला दिला सन्मान,
समाजात उंचावली तिची मान।
शोषित पीडितांचा आवाज झाले,
अन्यायावर खास केला प्रहार।
सत्यशोधक विचारांची धार,
बदल घडवणारा तो आधार।
जातिभेदांची मोडली भिंत,
त्यांनी मानवतेची जपली प्रीत।
फुले यांचे विचार अमर राहोत,
समतेचे विचार जगात पसरत राहोत।
- प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे
साकुरी, ता. राहता. जि. अहिल्यानगर
मो. ९६०४७९७३१६


Post a Comment
0 Comments