Type Here to Get Search Results !

लेफ्टनंट डॉं. शीतल के. गायकवाड यांना ‘सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल सर्व्हिस अवॉर्ड 2026’ प्रदान

* समाजसेवा, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल

खोपोली / खलील सुर्वे :- समाजसेवा, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तसेच शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर लेफ्टनंट डॉं. शीतल के. गायकवाड यांना प्रतिष्ठेचा “Sardar Vallabhbhai Patel National Service Award 2026” प्रदान करण्यात आला आहे. या सन्मानामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जिवरान फाउंडेशन तर्फे देण्यात आलेल्या या राष्ट्रीय पुरस्काराद्वारे डॉं. गायकवाड यांच्या समाजाभिमुख कार्याची दखल घेण्यात आली. क्रीडा क्षेत्रातील योगदान, सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण तसेच युवकांना प्रेरणा देण्याच्या कार्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.


डॉं. शीतल गायकवाड यांनी विविध सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण, युवक मार्गदर्शन तसेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या कामामुळे अनेक तरुणांना सकारात्मक दिशा मिळाल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले. तसेच समाजात शिस्त, सेवा आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय असल्याचेही सांगण्यात आले. त्यांच्या कार्यातून सामाजिक जाणीव आणि प्रेरणादायी नेतृत्वाची ओळख निर्माण झाली आहे.


हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर विविध सामाजिक संस्था, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून तरुणांसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement