* योजना पाटील यांच्याकडे मंडळाध्यक्षपदाची धुरा
* महिला संघटन अधिक मजबूत करण्यावर भर
* सर्व समाजघटकांतील महिलांना मिळाली संधी
भडगाव / प्रतिनिधी :- भारतीय जनता पक्षाच्या भडगाव मंडळ महिला मोर्चाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून महिला संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्षाने व्यापक स्तरावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला मोर्चाच्या मंडळाध्यक्षपदी योजना पाटील यांची निवड करण्यात आली असून विविध पदांवर अनेक महिला कार्यकर्त्यांना संधी देण्यात आल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम भडगाव मंडळ महिला मोर्चाची ही कार्यकारणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशान्वये जाहीर करण्यात आली. तसेच मंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे, प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉं. राधेश्याम चौधरी, महिला अध्यक्षा ॲंड. कृतिका आफ्रे आणि भडगाव मंडळ अध्यक्ष विनोद नेरकर यांच्या मान्यतेने ही कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे.
* उपाध्यक्षपदी सात महिलांची निवड :- महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी गायत्री बिरारी, सुनिता शिंपी, शिला पाटील, सुनिता चौधरी, सोनाली चौधरी, मोनाली बागल आणि नसीम बानो पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध समाजघटकांतील महिलांना या कार्यकारणीत प्रतिनिधित्व देण्यात आल्याने पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला चालना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
* सरचिटणीस आणि चिटणीसपदी नव्या जबाबदाऱ्या :- सरचिटणीसपदी चंदा पाटील, रंजना परदेशी, मनिषा पाटील आणि सुनिता माळी यांची निवड करण्यात आली आहे. तर चिटणीसपदी भावना राजपूत, हेमलता शिंपी, ज्योती पाटील, शारदा पाटील, मिनाक्षी पाटील, सुनिता पाटील आणि निता भंडारकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
* सोशल मीडिया आणि प्रसिद्धी विभागालाही बळ :- शहराध्यक्षपदी योगिता वाघ, कोषाध्यक्षपदी मनिषा पाटील, प्रसिद्धी प्रमुखपदी मिनाक्षी पाटील तर सोशल मीडिया प्रमुखपदी रूपाली पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आधुनिक राजकारणात सोशल मीडिया आणि जनसंपर्काला वाढते महत्त्व लक्षात घेता या विभागांवर विशेष भर देण्यात आल्याचे मानले जात आहे.
* महिला संघटन मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका :- या नव्या कार्यकारणीत मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून ग्रामीण व शहरी भागातील महिलांना पक्ष संघटनेत सक्रिय करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संघटन विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चाची ही कार्यकारिणी महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कार्यकारणी जाहीर होताच माजी आमदार दिलीप वाघ, महिला नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, युवा नेते अमोल शिंदे, किसान संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, पीटीसी चेअरमन संजय वाघ यांच्यासह विविध पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच महिला मोर्चाच्या माध्यमातून भडगाव तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Social Plugin