* नगरदेवळा आणि चाळीसगाव परिसरात आनंदाचे वातावरण
* मुस्लिम रितीरिवाज, शरीयत आणि दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने विवाह सोहळा संपन्न
नगरदेवळा / सैय्यद मुजफ्फर अली :- नगरदेवळा येथील सादिक अली सैय्यद युसुफ अली यांच्या कन्या अरशीन बानो हिचा साखरपुडा बुधवार, 20 मे 2026 रोजी चाळीसगाव येथील सलीम बेग महेबूब बेग मिर्झा यांचे सुपुत्र शाहबाज बेग यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडणार होता. मात्र, साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवर, ज्येष्ठ मंडळी आणि दोन्ही कुटुंबीयांच्या आग्रहास्तव मुस्लिम रितीरिवाज व शरीयतप्रमाणे थेट निकाह सोहळा पार पडला. त्यामुळे नगरदेवळा आणि चाळीसगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी उभारलेल्या शामियान्यात दोन्ही बाजूंचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वरपक्षाकडून सलीम बेग महेबूब बेग यांच्यासह महेबूब खान इब्राहिम खान, मतलूब खान इब्राहिम खान, मकसूद खान इब्राहिम खान, आरिफ खान इब्राहिम खान, सय्यद आसिफ अली जोहर अली, सय्यद शब्बीर अली जोहर अली, सय्यद महमूद अली सय्यद अली आणि इतर मान्यवरांनी निकाह सोहळा याच ठिकाणी पार पाडण्याची विनंती केली.
या विनंतीला वधूपक्षाकडून वधूचे वडील सादिक अली युसुफ अली, बडे अब्बू साबिर अली युसुफ अली तसेच दादा सैय्यद युसुफ अली यांनी आनंदाने संमती दर्शवली. “लब्बैक” म्हणत दोन्ही कुटुंबीयांनी निकाह सोहळा पार पाडण्यास होकार दिल्यानंतर उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
साधेपणात पार पडलेल्या या निकाह सोहळ्यात धार्मिक परंपरा, कौटुंबिक एकोपा आणि सामाजिक सलोखा यांचे सुंदर दर्शन घडले. अनावश्यक खर्च टाळून साखरपुड्यातच विवाह करण्याचा निर्णय घेत दोन्ही कुटुंबीयांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला. विशेष म्हणजे वर शाहबाज बेग हे नगरदेवळा येथील खिजर खान यांचे शालक असल्याने या निकाह सोहळ्याची परिसरात विशेष चर्चा रंगली होती. दोन्ही कुटुंबीयांचे सामाजिक संबंध आणि आपुलकीमुळे हा सोहळा अधिक संस्मरणीय ठरला.
या आनंद सोहळ्यास वधूपक्षाकडून दादा युसुफ अली, बडे अब्बा अजगर अली, अकबर अली, साबिर अली, मुहमद अली, आसिफ अली, चाचू फारुख अली तसेच फुफा कमर अली उपस्थित होते. तसेच वधूचे भाऊ जाविद अली, फरीद अली, सद्दाम अली, अख्तर अली, अफसर अली, इमरान अली, तनवीर अली, मिजान अली, माहीद अली, कौसर अली, सईद अली, मुश्ताक अली, अफरोज अली, सलमान अली आणि शाहिद अली यांनी पाहुण्यांच्या स्वागताची जबाबदारी सांभाळली. यावेळी फुफा शब्बीर अली, इरफान खान (नेरी) जिजाजी, आसिफ बेग (धुळे) जिजाजी यांच्यासह अनेक नातेवाईक उपस्थित होते.
निकाह सोहळ्यास नगरदेवळा येथील महेबूब सेठ, खिजर खान, सय्यद आसिफ, आरिफ खान इब्राहिम खान, सय्यद महमूद, मुस्तकीम खान केलेवाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वरपक्षाकडून सलीम बेग महेबूब बेग आणि अकील बेग महेबूब बेग (चाळीसगाव) यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.
निकाह सोहळा संपन्न होताच उपस्थितांनी नवदांपत्य अरशीन बानो आणि शाहबाज बेग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. “अल्लाह पाक दोन्ही परिवारांमध्ये कायम प्रेम, सलोखा आणि बरकत कायम ठेवो,” अशा भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आल्या. नवदांपत्याच्या भावी आयुष्यासाठी सर्व स्तरांतून मंगलमय शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Social Plugin