Type Here to Get Search Results !

पोलीस आणि जनतेमधील विश्वासाचा सेतू लक्ष्य पोलिस मित्र असोसिएशन

* असोसिएशनची राज्यभर सभासद नोंदणी मोहीम सुरू

* संस्थापक अध्यक्ष अविनाश मुळीक यांची घोषणा 

* युवकांना समाजहितासाठी पुढे येण्याचे आवाहन

* गुन्हेगारीविरोधात जनजागृती, आपत्ती काळात मदत, पोलिसांना सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी हेच संघटनेचे ध्येय

सांगली / प्रतिनिधी :- राज्यात पोलिस आणि सामान्य नागरिक यांच्यात समन्वय, विश्वास आणि सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या “लक्ष्य पोलिस मित्र असोसिएशन” तर्फे राज्यव्यापी सभासद नोंदणी मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश विष्णू मुळीक, राष्ट्रीय संयोजक फिरोज पिंजारी तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेश संयोजक खलील सुर्वे यांच्या वतीने या मोहिमेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

"पोलीसांच्या मदतीसाठी….समाजाच्या सुरक्षिततेसाठी…” हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेली ही संघटना गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत सामाजिक, जनजागृती आणि पोलिस सहकार्याची भूमिका पार पाडत आहे. आता संघटनेने अधिक व्यापक पातळीवर विस्तार करण्याचा निर्णय घेत राज्यभर युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि जबाबदार नागरिकांना जोडण्याचा संकल्प केला आहे.

* गुन्हेगारीविरोधात पोलिसांना मदत करण्याचा संकल्प :- लक्ष्य पोलिस मित्र असोसिएशनच्या माध्यमातून समाजात वाढत चाललेली गुन्हेगारी, अंमली पदार्थांचे जाळे, अवैध धंदे, महिलांवरील अत्याचार, सायबर गुन्हे आणि सामाजिक असुरक्षिततेविरोधात जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश मुळीक यांनी सांगितले की, सामान्य नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद वाढणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा माहितीअभावी किंवा भीतीपोटी नागरिक पुढे येत नाहीत. लक्ष्य पोलिस मित्र असोसिएशन ही नागरिक आणि पोलिस यांच्यातील विश्वासाचा दुवा बनून काम करणार आहे.


* आपत्ती, पूरस्थिती आणि सामाजिक सेवेत सक्रिय भूमिका :- संघटनेने यापूर्वी पूरग्रस्त भागात मदतकार्य, गरजूंना धान्य वाटप, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहीम तसेच सामाजिक सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबविल्याचे सांगण्यात आले. पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे, आपत्कालीन मदत, वाहतूक नियंत्रण, हरवलेल्या व्यक्तींना मदत, महिलांच्या सुरक्षेबाबत जागरूकता आणि पोलिस तपासात सहकार्य अशा विविध क्षेत्रांत संघटनेचे सदस्य सक्रिय असतात, असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


* राज्यभर सभासद नोंदणीला वेग :- राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर संघटनेचे जाळे उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून युवकांना संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सभासदांना ओळखपत्र, प्रशिक्षण, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग तसेच पोलिस प्रशासनासोबत समन्वय साधण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.


* समाजासाठी काम करणारे हात मजबूत करा :- राष्ट्रीय संयोजक फिरोज पिंजारी यांनी सांगितले की, आज समाजात नकारात्मक प्रवृत्ती वाढत आहेत. अशा परिस्थितीत जबाबदार युवकांनी पुढे येऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे काळाची गरज आहे. लक्ष्य पोलिस मित्र असोसिएशन ही केवळ संघटना नसून सामाजिक बांधिलकी जपणारे कुटुंब आहे.


* युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण :- सभासद नोंदणी मोहिमेच्या घोषणेनंतर अनेक जिल्ह्यांतून युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे संघटनेने सांगितले. आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम, प्रशिक्षण शिबिरे, जनजागृती मोहीम आणि पोलिस सहकार्य उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.


दरम्यान, “समाज सुरक्षित तरच राष्ट्र सुरक्षित” हा संदेश देत लक्ष्य पोलिस मित्र असोसिएशनने राज्यभर आपले संघटन मजबूत करण्यासाठी कंबर कसली असून या मोहिमेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, लक्ष्य पोलिस मित्र असोसिएशनमध्ये सहभागी होण्यासाठी संस्थापक अध्यक्ष अविनाश मुळीक (91465 04656) व राष्ट्रीय संयोजक फिरोज पिंजारी (8454886853) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement