Type Here to Get Search Results !

नगरदेवळा येथे बकरी ईदनिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न

नगरदेवळा / प्रतिनिधी :- आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नगरदेवळा येथे शनिवार, 23 मे 2026 रोजी शांतता समितीची विशेष बैठक उत्साहात आणि शांततेत पार पडली. सण सामाजिक सलोखा, कायद्याचे पालन आणि प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा व्हावा, यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

बैठकीत पशुधन विकास अधिकारी डॉं. एस. आर. बोरसे यांनी बकरी ईददरम्यान जनावरांच्या कत्तलीसंदर्भातील कायदे, नियम आणि शासनाच्या अटी याबाबत सविस्तर माहिती दिली. 28 मे ते 30 मे 2026 या कालावधीत कत्तलखाना सुरू राहणार असून, शासन नियमांनुसारच सर्व प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


ग्रामपंचायत नगरदेवळा यांच्या वतीने नागरिकांना प्रशासनाच्या नियमांचे पालन करून शांततेत आणि सामाजिक सलोखा जपत सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.


या बैठकीस गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, पोलीस प्रशासन तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीला पशुधन विकास अधिकारी डॉं. एस. आर. बोरसे, अरविंद वालजी पाटील (व्रणोपचारक), मिलिंद परदेशी (परिचर), अनवर शेख (सफाई कामगार), पोलीस कॉन्स्टेबल दिनेश महादु पाटील, माजी सरपंच अरुण आबा काटकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अ. गनी शेख कमरोद्दीन, नूर बेग चेअरमन, माजी ग्रामपंचायत सदस्य वसीम शेख, ज्येष्ठ नागरिक हबीब खाँ हनीफ खाँ, जुबेर खान, रहिमखाँ भिकनखाँ खान, फकीरा सय्यद गनी तसेच ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


यावेळी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले की, बकरी ईद हा आनंद आणि सामाजिक ऐक्याचा सण असून तो कायद्याच्या चौकटीत राहून साजरा करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच नगरदेवळा परिसरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement