* कुलगुरू डॉं. प्रकाश महानवर यांची स्मारकास भेट
* गुणवंत विद्यार्थी आणि डीवायएसपी पदासाठी निवड झालेल्या युवतींचा सत्कार
सांगली / अविनाश मुळीक :- सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देत स्मारकाच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरू डॉं. प्रकाश महानवर यांनी स्मारकाला भेट देऊन स्मारक परिसर, अभ्यासिका आणि विविध उपक्रमांची पाहणी केली.
याप्रसंगी डीवायएसपी पदासाठी निवड झालेल्या स्नेहल किसन गावडे आणि कोमल पाटोळे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास अभिमन्यू टाकले, बाळासाहेब कारणावर, डॉं. आर. डी. शेंडगे, माजी महापौर नितीन सावगावे, स्मारक समितीचे सचिव विष्णू माने, उद्योजक पांडुरंग रुपनर, किसन गावडे, ॲंड. सिद्धेश्वर ओलेकर, संजय पाटील, बाळू खांडेकर, गणेश माने, तानाजी दुधाळ, उत्तम हराळे, पोपट सरगर, अजित खरात, अरुण कुल्लाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरू डॉं. प्रकाश महानवर यांच्या हस्ते स्मारक परिसरातील अभ्यासिकेत शिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करीत त्यांनी अशा उपक्रमांमुळे ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.
यावेळी स्मारक समितीच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा प्रसार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य स्मारकाच्या माध्यमातून प्रभावीपणे सुरू असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी स्मारकाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.


Social Plugin