* विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
* सामाजिक, राष्ट्रीय व संघटनात्मक कार्याला बळ
मुंबई / हसीबूर शेख :- देशभरात सामाजिक सलोखा, संघटनात्मक बांधणी आणि विविध सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन या राष्ट्रीय पत्रकार संघटनेची राष्ट्रीय व राज्यस्तरीय नवीन कार्यकारिणी राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे यांनी जाहीर केली आहे. विविध राज्यांतील अनुभवी, सामाजिक कार्यात सक्रिय आणि संघटनात्मक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडीमुळे संघटनेच्या कार्याला नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी व राष्ट्रीय मार्गदर्शक प्रवीण कोळआपटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे यांनी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी डॉं. शरीफ बागवान तर राष्ट्रीय महिला अध्यक्षा म्हणून सना बेगम यांची निवड केली आहे. तसेच राष्ट्रीय महिला महासचिवपदी मानसी गणेश कांबळे, राष्ट्रीय संयोजक म्हणून अश्वनी कुमार, राष्ट्रीय सचिवपदी अनिल पवार आणि धवल माहेश्वरी, राष्ट्रीय महासचिवपदी ॲंड. अरविंद कुमार, राष्ट्रीय सहसचिवपदी लतेश शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी डॉं. अकबर शेख, राष्ट्रीय युवा सचिवपदी फैजान सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय संघटक म्हणून डॉं. शेखर जांभळे आणि राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख म्हणून तुषार तानाजी कांबळे यांचीही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
महिला विभागात राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा म्हणून श्रद्धांजली रॉय आणि श्रीमती शानू माहेश्वरी यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रीय कमिटी सदस्य म्हणून किशोर कुमार मोहंती यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर गोविंद माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून कमलेश शेवाळे, महाराष्ट्र प्रदेश संयोजक म्हणून अनिलकुमार पालिवाल आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अविनाश मुळीक यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
महिला आघाडीत महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून इशिका शेलार, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव म्हणून तनुजा गुळवी, महाराष्ट्र प्रदेश महिला संयोजक म्हणून प्रतिभा शेलार आणि महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष म्हणून डॉं. अर्चना मेडेवार यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांमध्ये हरियाणा प्रदेशाध्यक्ष हेमेंद्र कुमार शर्मा, कर्नाटक प्रदेश संयोजक रविश हेगडे, उत्तर प्रदेश महासचिव अनिस कुरेशी, उत्तर प्रदेश उपाध्यक्ष कमल शुक्ला, राजस्थान प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश जैन, ओडीशा प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद कुमार रॉय, मध्य प्रदेश सचिव अयाज हुसैन तसेच झारखंड प्रदेश महिला सचिव कनक सिंग तर कोकण प्रदेशाध्यक्ष म्हणून राजेंद्र शिवाजी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून देशभरात सामाजिक एकोपा, युवक संघटन, महिला सक्षमीकरण, जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Social Plugin