* झी 24 तास फेम कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे होणार कीर्तन ; शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पुढाकार
नगरदेवळा / प्रतिनिधी :- शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख, जि. प. जळगाव शिवसेना गटनेते तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा माजी सभापती रावसाहेब मनोहर गिरधर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरदेवळा येथे भव्य जाहीर कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात होणाऱ्या या कार्यक्रमाची परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे. हा जाहीर कीर्तन सोहळा आज सोमवार, 25 मे 2026 रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत नगरदेवळा येथील नदीपात्र परिसरात संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विनोदी कीर्तनकार व झी 24 तास फेम ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे हे आपल्या ओजस्वी व विनोदी शैलीत कीर्तन सादर करणार आहेत. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधन, अध्यात्म, संस्कार आणि विनोद यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
रावसाहेब गिरधर पाटील हे सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून धार्मिक वातावरणात समाज एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अल्पसंख्याक आघाडी तसेच नगरदेवळा-बाळद जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, शिवसैनिक, भाविक आणि कीर्तनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Social Plugin