Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात नैसर्गिक उपचार शिबिराचे आयोजन

* सांधेदुखी, कंबरदुखी व नसांच्या विकारांवर उपचार

* 2 जून रोजी नगरदेवळा येथील वाणी गल्लीत शिबिर

* गुजरात येथील वैद्यांकडून उपचार ; ऑपरेशन टाळण्यास मदत

नगरदेवळा / मुरलीधर परदेशी (विशेष प्रतिनिधी) :- नगरदेवळा येथे विविध प्रकारच्या सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी, संधिवात तसेच नसांशी संबंधित विकारांवर नैसर्गिक पद्धतीने उपचार करण्यासाठी विशेष उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 2 जून 2025, मंगळवार रोजी हे शिबिर नगरदेवळ्यातील वाणी गल्ली, दीपक इलेक्ट्रिकल्स जवळ येथे आयोजित करण्यात आले असून परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिबिरात गुजरात येथील अनुभवी वैद्य बुधा आर. आहिर आणि गुलाब आर. आहिर हे उपस्थित राहून उपचार करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. विविध प्रकारच्या वेदना आणि नसांच्या समस्यांवर औषधांशिवाय व नैसर्गिक पद्धतीने उपचार करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.


* कोणत्या समस्यांवर उपचार ? :- आयोजकांच्या माहितीनुसार कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी, गुडघेदुखी, संधिवात, फ्रोजन शोल्डर, नस दाबल्या जाणे, हात-पाय सुन्न होणे, मुंग्या येणे, मांडी मारून बसता न येणे, बॉल जॉइंटची समस्या आदी तक्रारींवर उपचार करण्यात येणार आहेत.


विशेष म्हणजे, या उपचार पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचा करंट, इंजेक्शन किंवा शस्त्रक्रिया नसून शरीरातील विशिष्ट नसांवरील पॉइंट दाबून उपचार केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.


* ऑपरेशन टाळण्यास मदत होऊ शकते :- शिबिराच्या जाहिरातीत ज्या रुग्णांना डॉंक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला आहे, त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उपचारामुळे काही रुग्णांना शस्त्रक्रिया टाळण्यास मदत होऊ शकते, असा दावा आयोजकांनी केला आहे.


शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी उपचारासाठी येतांना चहा, नाश्ता किंवा जेवण करून यावे, अशी सूचना देण्यात आली आहे. उपचारासाठी नोंदणी व अधिक माहितीसाठी आयोजकांनी संपर्क क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे.


नगरदेवळा आणि परिसरातील नागरिकांना नैसर्गिक उपचारांचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement